Goyal Brothers Anandi Marathi for Class 2
जीवनाच्या विविध क्षेत्रात विचार विनिमयाचे साधन म्हणून आपण भाषा वापरतो. दैनोंदेन व्यवहार पार पाडणे, विचार करणे, ज्ञान ग्रहण आणि ज्ञान संवर्धन करणे, समाज प्रबोधन करणे असे विविध पातळ्यांवरचे व्यवहार माणूस भाषेच्या आधारावरच करु शकतो. भारतीय वंशाच्या विविध समृध्द भाषांपैकी एक मराठी भाषा!! शालेय स्तरावर मराठी भाषा शिकताना विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. मुले वयाने लहान असली तरी त्यांची शिकण्याची आणि समजण्याची क्षमता अफाट असते. हा विचार करुनच त्यांच्या 'निरागस आणि कोवळ्या मनावर ताण न देता त्यांना शिकवण्याची जबाबदारी हे पुस्तक पार पाडेल.
आधुनिक पध्दतीने शिक्षणाच्या आवश्यकतेनुसार आणि मुलांची मानसिकता, रुची, ग्रहण क्षमता लक्षात घेऊन आम्ही इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्ययार्थ्यांसाठी 'आनंदी' पुस्तक मालिका सादर करत आहोत. पारंपरिक भाषा शिक्षणाच्या ठराविक चाकोरीत न राहता जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करुन विदयार्थ्यांच्या मनात प्रश्न विचारण्याची आणि “आणखी काही' जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. रचनात्मकता, कलात्मकता आणि परिपूर्णतेनं नटलेल्या या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये:
* ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या, भाषेच्या चार अपेक्षित योग्यतांचा विकास करण्यासाठी विशेष प्रयल.
* भाषा कौशल्यासाठी गोष्टी, गाणी, बालकथा, बोधकथा, चित्रकथा, पत्रलेखन, गंमतशीर कविता इत्यादींचा समावेश.
* चित्रांद्रारे अभ्यास सोपा आणि मनोरंजक होईल. कारण “हसत-खेळत शिका' हे या पुस्तकाचे धोरण आहे.
Product Name | Goyal Brothers Anandi Marathi for Class 2 |
---|---|
ISBN / Product Code | 9789386569868 |
School Books | Text Books |
Select Books by Class | Class 2 |
Subject : School Books | Marathi |
Year Of Publication | 2024 |
Publisher | Goyal Brothers Prakashan |
HSN Code | 4901 |
Company Details | Published by Goyal Brothers Prakashan, D-231, Sector-63, NOIDA (UP) 201301. In case of any queries regarding products please call at 0120- 4655555 or email at info@goyal-books.com. |